Top News

दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे दमनिया आणि खडसे यांच्यातील वाद वाढत असल्याचं दिसतंय.

खरे मर्द असाल तर उच्च न्यायालयात माझ्याशी लढून दाखवावं, असं थेट आव्हान अंजली दमानियांनी दिलं होतं. खडसेंनी दाखल केलेल्या खटल्याबाबत पोलीस अटक करण्याआधीच त्या पोलिसांकडे पोहोचल्या होत्या. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला होता.

दमानियांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही त्या पोलिसांना आव्हान देतात, तरीही गृहखातं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, यामुळेच त्यांचीही हिम्मत वाढत असावी, असंही खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-खडसे-महाजन वाद अन् पंधरवड्यातील घटनांमुळे जळगावात भाजपची परिस्थिती बिकट

-कुटुंब विस्तारासाठी सुट्टी हवी, पोलीस शिपायाचा गमतीशीर अर्ज

-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या