बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा ‘वर्णभेद’ ही मोठी समस्या – नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई | सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर बाॅलिवूडमधील वाद प्रकर्षाने समोर येत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बाॅलिवूडमध्ये घराणेशाही पद्धत असल्याची टीका अनेक कलाकारांनी केली होती. तर ‘मी टू’ चळवळीनंतर देखील बाॅलिवूडमधील वाद समोर आले होते. अशातच आता वेबसिरीजमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मोठं वक्तव्य केलं आहे.

सुधीर साहेबांना चित्रपटसृष्टीचे प्रचंड ज्ञान आहे. तसेच त्यांचे विचार देखील चांगले आहेत. त्यांनी नुकतंच इंदिरा तिवारीला चित्रपटात चांगली भूमिका दिली. मला असं वाटतंय की, आपल्या चित्रपटसृष्टीत वर्णभेद केला जातो. जर या चित्रपटानंतर इंदिरा तिवारीला चांगला चित्रपट मिळाला तर मला आनंदच होईल. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीपेक्षा वर्णभेद ही मोठी समस्या आहे, असं नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटलं आहे.

मी गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टींचा सामना करतोय. मी त्वचेच्या रंगाविषयी बोलत नाही. पण हा भेदभाव थांबवायला हवा. माझी उंची कमी असल्यानं मला अनेकदा नकार देण्यात आला होता मात्र, मी त्याविषयी कधी तक्रार केली नाही, असंही नवाजुद्दीन म्हणाला आहे. त्यामुळे आगामी काळात इंदिरा तिवारींसारख्या अभिनेत्रींना देखील भूमिका मिळतील, अशी आशा देखील नवाजुद्दीनने यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘बाॅलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. अनुराग कश्यपच्या प्रसिद्ध साॅक्रेट गेममध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर नवाजुद्दीन प्रसिद्धीस आला होता.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिलं”

नात्याला काळिमा फासणारी घटना, सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More