अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

नांदेड |  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना भावनिक साद घातली आहे. मी तुमच्या सोबतच जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार, असं म्हणत त्यांनी भरभरून मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय.

नांदेडच्या प्रचारसभेत अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केलं.

नांदेडमध्ये 2 दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या आरोपांना चव्हाणांनी जोरदार उत्तरे दिली.

दरम्यान, भाजप सरकार मला अडकविण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप चव्हाणांनी सत्ताधारी पक्षावर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे लोकं माझा दाभोलकर करतील; पण मी मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

-“हेलिकाॅप्टरने फिरण्याइतका पैसा प्रकाश आंबेडकरांना मिळतो कुठून?”

-हा काँग्रेस आमदार करणार शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार; काँग्रेसला धक्का

-राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत

-“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”