देश

मे महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या; काही कामं असतील तर आताच करून घ्या…

मुंबई | देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी टाळेबंदी करण्यात आलेली आहे. अशाही परिस्थितीत देशभरातील बँका सुरू आहेत. मात्र मे
महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या असणार आहेत.

मे महिन्यात काही ठिकाणी राज्यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्यांचा समावेश आहे. तर काही दिवस सर्वत्रच बँका बंद राहणार आहेत.

बँकांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आल्यानं बँका सुरू आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहता काही बँकांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. तर काही ठिकाणी कर्मचारी आलटूनपालटून कामावर येत आहेत.

मे 2020 मध्ये कधी राहणार बॅंक बंद?

1 मे, शुक्रवार – कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन
3 मे, रविवार – सार्वजनिक सुट्टी
7 मे – बुद्ध पौर्णिमा
8 मे – रविंद्र नाथ टागोर जयंती (कोलकाता मध्ये सुट्टी)
9 मे – दुसरा शनिवार
10 मे- रविवार
17 मे – रविवार
21 मे- शब-ए-कादर सण असल्याने (जम्मू, श्रीनगर मध्ये सुट्टी)
22 मे- जुम्मा अलविदा (जम्मू, श्रीनगर मध्ये सुट्ट)
23 मे- चौथा शनिवार
24 मे- रविवार
25 मे – रमजान ईद
31 मे – रविवार

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

जगभरात कोरोनाचा हाहाकार, तब्बल 30 लाख लोकांना कोरोनाची लागण तर 2 लाख मृत्यू!

माणुसकी मेली?; पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही

हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या