Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“भाजपचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी, केवळ निवडणुकीपुरते शिवाजी महाराज हवेत”

मुंबई | भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना इतर स्लोगन न वापरण्याची समज दिली.

मात्र या घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत. यावर ‘भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात,’ अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलीये.

 

 

यावर भाई जगताप यांनी ट्विट करत ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचं नाव घेतलेलं तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असं म्हटलंय.

उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हणाले की, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होतोय. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावं.”

महत्त्वाच्या बातम्या-

अस्मिता महत्त्वाची की लाचारी ते ठरवा- संदीप देशपांडे

राजगृह तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी केली दुसरी मोठी कारवाई

कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच कोकिलाबेन रूग्णालयात ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया

खासगी लॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह तर सरकारी अहवाल निगेटिव्ह; पुण्यातील धक्कादायक प्रकार

धारावीचा धोका टळला अन् सुरू झालाय मुंबईतल्या या भागात कोरोनाचा हैदोस!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या