Top News

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत भाजपचा सत्कार सोहळा; भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा

वर्धा | लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत वर्ध्याच्या भाजप कार्यालयात नवनियुक्त भाजप नेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पोलिसांना कार्यक्रमाची माहिती मिळताच ते भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यक्रम बंद पाडला.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत वर्ध्याचे राजेश बकाने यांची सचिवपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला वर्ध्याचे भाजप आमदार पंकज भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लावली. याबाबत वर्ध्याच्या तहसीलदारांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना माहिती देत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलीस भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना कार्यालयात कार्यक्रम सुरु असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आयोजकांना तातडीने कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; गृहमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय उद्धव ठाकरेंनी फिरवला!

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील ‘या’ तीन औषधांवर आणली बंदी

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 6555 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

शिवसेना नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, बाळासाहेब थोरात म्हणाले…

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या