बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांना ट्रोल करायला प्रायव्हेट कंपनी, राजकीय हेतूमधून जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय- भाजप

मुंबई |  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या उणीवा अतिशय चाणाक्षपणे आणि अभ्यासू पद्धतीने दाखवत आहेत. मात्र त्यांना वारंवार ट्रोल केलं जात आहे. फडणवीसांना ट्रोल करायला प्रायव्हेट कंपनी हायर करण्यात आलेली आहे, असा आरोप भाजप आमदार अनिल चोले यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टवर गेले काही दिवस नेटकरी स्मायली इमोजीचा तसंच कमेंटमध्ये त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. राजकीय हेतूमधून त्यांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जात आहे, असं म्हणत नागपुरातील भाजप नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन ट्रोलर्सवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं वातावरण असताना आमच्या नेत्यांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी एखादी भूमिका मांडतात किंवा मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहितात त्यावेळी त्यांना ट्रोल करायला एक टोळी बसलेली आहे. त्यांनी धान्य वाटपाचा मुद्दा उपस्थित केला किंवा नायर हॉस्पिटलबाबतचा मुद्दा उपस्थित केला. परंतू याविषयावर बोलताना त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग केलं जात आहे, असं अनिल चोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटायला गेले तर त्यावरूनही ट्रोलिंग केलं जात आहे. वास्तविक राज्यपालांना भेटण्याचा अधिकार त्यांना आहे. राजकीय हेतूपोटी त्यांना ट्रोल करायला एक टोळी बसली आहे, असंही चोले म्हणाले.

दरम्यान, भाजप नेत्यांनी पहिल्यांदा ट्रोलर्स प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आता नागपुरच्या भाजप नेत्यांनी देखील नागपुर पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेस कमी पडली; पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली

“सरकारने लघु, मध्यम उद्योगांना विशेष पॅकेज द्यावं तसंच लॉकडाऊनचे अधिकार राज्यांना द्यावेत”

काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More