बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

बीड | मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे. या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 35 जण दगावले आहेत तर जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर 20 लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केज विधानसभा मतदार संघातील लोकांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

केज विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये 100 टक्के नुकसान झालं आहे. सर्व रस्ते बंद आहेत. शेतीमध्ये गुडघाभर पाणी साचले आहेत. हे नुकसान टक्केवारीमध्ये मोजता येणार नाही. त्यामुळे पंचनामे न करता अगदी सरसकट शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी असं नमिता मुंदडा यांनी म्हटलं आहे.

बीड, औरंगाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये पावसाचं रौद्ररूप बघायला मिळतंय. केज, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीच पाणी साचलं आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने अनेक नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे तर माजलगाव धरणाची पाण्याची पातळी वाढल्यामुळे सिंदफना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीही दुथडीभरून वाहू लागली आहे. मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या गावांना पूराचा धोका वाढला आहे.

दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यात आतापर्यंत 20 लाख हेक्टर नुकसान झालं आहे. त्या सर्वांना मदत करण्याच्या सुचनाही विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

#Video | देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो! ताजोद्दीन महाराजांनी चालू कीर्तनात देह ठेवला

“आमच्या सरकारमध्ये मोबाईल वाजला तर शेतकऱ्यांना वाटायचं मदत आली”

“पंतप्रधान मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला मदत जाहीर करावी”

‘एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी…’; फिक्सिंगच्या आरोपावर श्रीसंतने सोडलं मौन!

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More