बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज 2021-22 या वर्षासाठीचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात येईल. अशातच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाविषयी देशातील खासदारांना आवहान केलं.

अधिवेशनाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासादारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या प्रगतीसाठी चर्चा करावी असं आवाहन केलं आहे. याशिवाय त्यांनी म्हटलं की, अर्थसंकल्प अधिवेशनातील आपलं बोलणं, चर्चेचे मुद्दे, होणारी चर्चा ही जागतिक प्रभावाची मोठी संधी बनू शकतात. सर्व पक्षांनी देशाच्या प्रगतीसाठी मोकळ्या मनाने चर्चा करावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 टप्प्यात विभागण्यात आलं आहे. पहिला टप्पा 31 जानेवारी, दुसरा टप्पा 11 फेब्रुवारी आणि तिसरा टप्पा 14 मार्चपासून सुरू होईल. हे अधिवेशन 8 एप्रिल रोजी संपणार आहे.

दरम्यान, उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन 2022-23 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे आता 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना व्हायरसच्या लढाईत आता ‘ही’ लस ठरणार गेमचेंजर

तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

घशात दुखत असेल तर करा ‘हे’ नैसर्गिक उपाय, मिळेल त्वरित आराम

अभिमानास्पद! इस्राएलमधील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

धक्कादायक! रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More