बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CBSE बारावीचा निकाल जाहीर; परंपरा कायम ठेवत मुलींनीच मारली बाजी

नवी दिल्ली | सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. तसेच यंदा जाहीर झालेल्या निकालानुसार मुलांपेक्षा मुलींनीच या परिक्षेत बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच एकुण निकाल हा 99.37 टक्के लागला असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईसह राज्य बोर्डांनाही 31 जुलैपर्यंत निकाल जाहिर करण्याच्या सुचना केल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सुचनेनुसारच आज सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी निकालात मुलींनीच बाजी मारली असुन मुलींचा निकाल 99.67 टक्के लागला आणि मुलांचा निकाल 99.13 टक्के एवढा लागला आहे. त्यामुळे दरवर्षीची परंपरा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सीबीएसई बोर्डाच्या निकालामध्ये यावर्षी एकुण परिक्षार्थींपैकी 99.37 टक्के परिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच मुलांपेक्षा मुलींचं पास होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

सीबीएसई बारावीचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण येत्या उद्यापर्यंत न्यायालयाने वेळ दिली असताना उद्या निकाल लागतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर!

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

पुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More