बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर वारंवार आरोप करताना दिसत आहेत. त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगताना दिसतंय. या वादात आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, अशी खोचक टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही. निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, अशी टीका देखील रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, असं खळबळजनक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी”

“काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर…”; काँग्रेसचं पाटलांना प्रत्युत्तर!

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

बाप बापच असतो… बिबट्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More