बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साकीनाका बलात्कार प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ ढसाढसा रडल्या!

मुंबई | साकीनाकामध्ये झालेल्या बलात्काराने सर्वांना सुन्न केलं आहे. या घटनेमध्ये आरोपीने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. अशातच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ महिलेची भेट घेण्यास रुग्णालयात पोहोचल्या.

9 सप्टेंबरला आरोपीने महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवली होती. त्यामुळे पीडीत महिलेची प्रकृती प्रचंड नाजूक झाली असून तिच्यावर उपचार सुरु होते. यादरम्यान चित्रा वाघ पीडीत महिलेची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचल्या. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली.

महिलेच्या मृत्यूची बातमी ऐकून चित्रा वाघ ढसाढसा रडल्या. तसेच माध्यमांशी संवाद साधताना देखील त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी मी निशब्द झाले असून महिलांचा अंत पाहू नका, असं म्हटलं आहे. ज्या पद्धतीने महिलेवर आत्याचार झाला तो राक्षसी असून अक्षरशः तिचे आतडे कापले गेल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात अनेक आत्याचार होत आहे. जे चालू आहे ते आपण फक्त पाहतोय, करत काहीच नाही, हे कुठं तरी थांबायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच उरला नाही, असा घणाघात देखील चित्रा वाघ यांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी!

“आम्ही इंचभरही सरकार हलू देणार नाही, याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली”

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी!

मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरली, अत्यंत अमानुष घटना उघड

नितेश राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र, म्हणाले….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More