मुंबई | या सरकारचं कुणाच्या हातात आहे?, अशी चर्चा सातत्याने रंगते आहे. याच प्रश्नाला उत्तर देताना कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे, मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. सरकारचं काम अगदी व्यवस्थित चाललं आहे”
हे सरकार मी एकटा चालवत नाही. माझे सर्व सहकारी सक्षम आहेत. आम्ही तिन्ही पक्षांचे सहकारी मिळून हे सरकार चालवतो आहे. त्यामुळे राज्याच्या विरोधी पक्षाने सरकार चालण्याची काळजी करू नये, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिवसेना 30 वर्ष भाजपासोबत होती. त्यावेळी त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात एवढी वर्ष लढलो त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”
“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”
मोदींपाठोपाठ ट्रम्प यांचाही चीनला मोठा झटका, अमेरिकेत देखील टिकटॉकवर बंदी!