बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ आठ जणांना मिळणार तिकीट

पणजी | आगामी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या आठ उमेदवारांच्या नावाची यादी जाहिर केली आहे.(Goa Assembly Election)

गोव्यातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असताना काँग्रेसने (Congress) पहिल्या टप्प्यात आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. इतर उमेदवारांच्या नावाची यादीही लवकरच जाहिर होणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

गोवा काँग्रेसने मापुसा मतदारसंघातून सुधीर कानोलकर,तळैगाव येथून टोनी रॉड्रिग्ज, पोंडामधून राजेश वेरेणकर, मरमुगाव मतदारसंघातून संकल्प अमोणकर, कुर्तोरीम येथून अलेक्सो ल्युरेन्को, मारगाव मतदारसंघातून दिगंबर वसंत कामत, कुकोलिम येथून युरी अलेसाव व क्यूेएपम मतदारसंघातून अल्टोन डिकोस्टा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसने सर्वात आधी उमेदवारांच्या नावाची घोषणा करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत एकुण 40 आहेत. पण काँग्रेसने मतफुटीच्या भीतीने सर्वात आधी यादी जाहीर केली असल्याची चर्चा रंगत आहे.

थोडक्यात बातम्या-

रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, अन्यथा…

‘…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

चिंताजनक: महाराष्ट्र राज्य ठरतंय Omicronचं हाॅटस्पाॅट

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही”

येत्या 3-4 दिवसांत थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More