बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

मुंबई | मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्ष देशातील राजकारणात मागे पडत चालेलला दिसत आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पक्षात बरेच अंतर्गत कलह देखील चालले आहेत. याच मुद्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला एक सल्ला दिला आहे. काॅंग्रेस पक्ष हेडलेस झाल्यानं भाजप त्याचा फायदा घेत आहे. यामुळे काँग्रेसनं लवकर अध्यक्ष नेमावा, असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षाला जोपर्यंत कोणी अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये जो गोंधळ सध्या चालू आहे तो तसाच चालू राहील. पक्षाला अध्यक्ष मिळेपर्यंत हा गोंधळ थांबणार नाही, असं माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वाटतं.

तसेच राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्ष हेडलेस झाला आहे. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसचा फायदा भाजप घेत आहे. काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष असल्यानं काॅंग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे नेण्यासाठी काँग्रेसने अध्यक्षपदाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असं राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, गांधी परिवाराकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व असलं तरी देखील पक्षाला एक अध्यक्ष हवा. अध्यक्ष बसून दिशानिर्देशन करत असतो. पक्षाला कोणी जर प्रमुख असेल तर निश्चितच पक्षाला गती मिळेल, असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

“महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून भाकीत होत आहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून दिलासा नाहीच

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More