बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 485 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 432 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,37,675 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16048 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,14,424 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी, महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं”

‘देवांचा देव तु गंमपती…’; चिमुकलीने बोबड्या आवाजात लावलेल्या सुराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

‘आम्ही बेडरूममध्ये असायचो तेव्हा…’; शरीरसंबंधाबाबत महिलेने पतीविरोधातच केली पोलिसात तक्रार!

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More