बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”

मुंबई | सरकार आणि प्रशासनाला तबलिगी जमाच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये. हे प्रकरण माणुसकीने सोडवलं पाहिजे. द्वेषाने नाही. मरकजच्या सदस्यांना सुरक्षित वाटेल ही सरकारची जबाबदारी असल्याचं मात-उलेमा-ए-हिंदचेप्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी म्हटलं आहे.

भारतात 10 लाख मशिदी आहेत. सर्वजण सरकारकच्या आदेशांचं पालन करत आहेत.कोरोनाविरोधातील लढाईत आम्ही सगळे एकत्र आहोत. भारतातील मुस्लीम 100 टक्के देशासोबतअसून अशीच साथ देत राहू,असं मौलाना महमूद मदनी यांनी सांगतिलं आहे.

मुस्लीम धर्म किंवा नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा मदनी यांनी निषेध केला आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नयेयासाठी सर्व मुस्लीम कटिबद्ध आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. नमाजच्या वेळी देखील याचं पालन झालं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रातील 1400 जणांची निजामुद्दीनला हजेरी; आरोग्यमंत्र्यांची खळबळजनक माहिती

केंद्राने धान्य देताना कोणतीच अट ठेवली नाही मात्र राज्य सरकारने अटी ठेवल्या आहेत- फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

“बाकी देशाचे पंतप्रधान उपचार शोधत आहेत आणि आमचे टाळ्या वाजवायला अन् मेणबत्या पेटवायला सांगतायेत”

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव; मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

दिवे लावा म्हणणं हा खुळचटपणा- राजु शेट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More