देश

दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार!

नवी दिल्ली | 31 डिसेंबरला संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत. तसेच यंदा कोरोनाचं सावट असलं तरी देखील या परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन म्हणजेच लेखी स्वरूपात होणार आहेत.

सीबीएसई इयत्ता 10 आणि वर्ग 12 च्या बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक आज जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखेची घोषणा आज संध्याकाळी 6 वाजता करणार आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी नुकतीच बोर्डाच्या परीक्षांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता ते परीक्षेच्या तारखा जाहीर करणार आहेत.

CBSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांचा यामुळे संभ्रम होणार नाही. तर यंदाची परीक्षा लेखी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या अनुशंगानं तयारीला लागणं गरजेचं आहे.


थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! कराडच्या प्रगती शर्माने पटकावलं 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज

तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या