बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?

मुंबई | एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली. शिवसेनेतील (Shivsena) सर्वात मोठ्या बंडखोरीनंतर वेगळ्या विचारसरणीचे तीन पक्ष एकत्र येत तयार झालेलं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं व राज्यात शिंदे सरकार (Shinde Goverment) सत्तेत आलं.

महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षादरम्यान अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायवर शस्त्रक्रिया पार पडल्याने ते या घडामोडींमध्ये कुठेच दिसले नाहीत. मात्र, राज्याचे नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी होणारी ही भेट मुंबईतील मुसळधार पाऊस व फडणवीसांचा पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेला दौरा यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस 11 वाजता राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी फडणवीस राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करतील. तसेच सध्याची राजकीय स्थिती व आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहीत फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. तसंच पक्षनिष्ठा काय असते हे फडणवीसांनी दाखवून दिलं म्हणत राज ठाकरेंनी त्यांचं कौतुक देखील केलं होतं. तर फडणवीसांनी देखील विधानसभेतील भाषणात राज ठाकरेंच्या पत्राचा उल्लेख केला होता. त्यामुळे आजच्या भेटीत काय राजकीय खलबतं होणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

“दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, 165 आमदारांचं पाठबळ तरी… ”

ललित मोदी अन् अभिनेत्री सुष्मिता सेनचं झालं लग्न?, खासगी फोटो व्हायरल

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More