महाराष्ट्र मुंबई

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई | शेतकर्‍यांना कुठलीही मदत मिळाली नाही. अशात शेतमाल खरेदीसुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार 50 टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे, असं फडणवीस म्हणालेत.

अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ 80 टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असं फडणवीसांनी सांगितलंय.

राज्य सरकारने तातडीने विदर्भातील प्रशासनाला निर्देश देऊन, दिवाळी 7 दिवसांवर आली असताना तातडीने मदत वितरित करावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे- मुकेश खन्ना

अर्णबला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, हरिश साळवेंच्या प्रश्नावर कोर्ट म्हणालं…

गोव्यात आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक!

“300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही”

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या