मुंबई | माझे आणि विनायक मेटेंचे 1996 पासून संबंध आहेत, गेल्या काही वर्षात आमची घट्ट मैत्री झाली आहे, त्यामुळे माझ्या अडचणीत मेटे नेहमीच धावून येतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी मेटेंनी नेहमीच लढा दिला आहे आणि अजूनही देत आहेत, त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. तसंच मराठा आरक्षण न्यायालयात न टिकण्याला आघाडीचं सरकारचं जबाबदार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम
-स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे
-…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!
-या तारखेपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!
-मला एक खून करायचा आहे- राज ठाकरे