…म्हणून मनुवादी सरकारने कोरेगाव भीमा प्रकरण घडवले!

उस्मानाबाद | मराठा-धनगर-मुस्लिम-लिंगायत समाज आरक्षण मागत आहेत म्हणूनच मनुवादी सरकारने कोरेगाव-भीमाचे प्रकरण घडवले, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्ला चढवला. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा भूममध्ये आली असताना ते बोलत होते.

ही लढाई कर्जमाफीसाठी आहे. बेरोजगारांसाठी आहे. महागाईविरोधात, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी हा हल्लाबोल आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

दरम्यान, ऑनलाईन कर्जमाफीचा शेतक-यांच्या खात्यावर एक रुपयाही आला नाही, मात्र हे काम करणाऱ्या इनोव्हेव कंपनीच्या खात्यावर 100 कोटी रुपये जमा केले आहेत आणि जाहिरातीवर 300 कोटींची उधळपट्टी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.