“आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला”
मुंबई | ठराव रेशीम बागेमध्ये संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्व जातींना आरक्षण दिलं पाहिजे, असा ठराव करा आणि मग आमच्यावर बोला, असं आव्हान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन आज मुंबईत पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
विरोधक आज उठतात आणि आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात. मध्यप्रदेशच्या निकालाचे दाखले विरोधक देतात. मग सत्ता असताना भाजपने मागच्या पाच वर्षात मध्यप्रदेशसारखा निर्णय का घेतला नाही? असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच सुप्रीम कोर्टात साक्षीपुरावे सादर झाले आणि फक्त निकाल आमच्या काळात लागला. मग आमच्यावर कसे काय आरोप करतात? भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी खरमरीत टीकाही धनंजय मुंडे यांनी केली.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मंत्री नवाब मलिकांना ईडीचा दणका
“उद्या मी अर्ज भरणार, त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली”
ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवारांची केंद्राकडे मोठी मागणी!
मंकी पॉक्सबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
“यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर…”
Comments are closed.