बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!

नवी दिल्ली | नवी दिल्लीमध्ये निघालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडालेली पहायला मिळाली. या चकमकीकडे पोलीस तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं जखमी झाले आहेत. मात्र यामध्ये शेतकऱ्यांवर लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवल्याचा गंभीर आरोप केला जातोय, जो अत्यंत खोटा आहे.

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून त्या जागी आपलं निशाण फडकावल्याचा (काही जण याला खलिस्तानी झेंडा म्हणत आहेत) आरोप केला जात आहे. मात्र लाल किल्ल्यावरील तिरंग्याला शेतकऱ्यांनी कुठलाही धक्का लावलेला नाही.

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्या समोरील दुसऱ्याच एका खांबावर आपलं निशाण फडकावलं आहे. मिळालेल्या माहितीनूसार, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या जागेवर ध्वजारोहन होतं. मात्र इतर वेळी तिरंगा हा लाल किल्ल्याच्या सर्वात वरील टोकावर फडकत असतो.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या फोटो तसेच व्हिडीओमध्येही ही बाब अधोरेखित होतेय की शेतकऱ्यांनी तिरंग्याला कुठलाही धक्का लावलेला नाही. दरम्यान, यासंदर्भात सोशल मीडियावर काही गटांकडून मात्र अपप्रचार केला जात आहे, जो साफ खोटा आहे.

दरम्यान, दिल्लीत घडलेला आजचा प्रकार अत्यंत दुर्देवी होता. हिंसाचाराचं समर्थन कुणीही करु शकणार नाही. सरकारने शेतकऱ्यांचा रोष ओळखून वेळीच वाटाघाटीची पावलं उचलायला हवी होती, तसेच शेतकऱ्यांनीही संयम राखायला हवा होता.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य वाटतं, इतक्या निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय”

‘शीतल आज तू हवी होतीस’; लेकीसाठी विकास आमटेंची भावनिक पोस्ट

आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते, ते…. – अजित पवार

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More