बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी

मुंबई | सध्या राज्यात ईडीचा धाडी टाकण्याचा दणका सुरुच असलेला पहायला मिळत आहे. अशातच ईडीनं अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणांमध्ये धाडी टाकल्याचं समोर आलं आहे.

आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणाऱ्या दाऊद इब्राहिम प्रकरणी आता ईडीनं मोठी कारवाई केली आहे. 1980 च्या दशकामध्ये भारत सोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणाचा अंदाच आहे. त्यामुळे या प्रकरणी ईडीनं चौकशीचा सपाटा लावला आहे .

महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची चौकशीही ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. अशातच 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल 29 वर्षांनंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आली आहे.

पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरववर्ल्डचा वापर दहशत पसरवण्यासाठी करत आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकणी आणखी कोणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर

“किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे”

“दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु कारण 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील”

पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More