गोंदिया महाराष्ट्र

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…

गोंदिया | एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी  फेसबुक पोस्ट लिहित करुणा शर्माशी माझे संबंध आहेत तसंच आम्हाला दोन मुलेही आहेत, असं सांगितलं.

धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर अनेक नेत्यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

एकनाथ शिंदे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे शिवसेना मेळाव्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? असं विचारलं. यावर नो कॉमेंट्स असं म्हणत  एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या