बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांचा दौरा पुण्यात होता. पुण्यात महत्वाच्या बैठका झाल्यानंतर, त्यांनी रात्री दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात जाऊन जेष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटेंची(Dr. Prakash Amte) भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली. प्रकाश आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याने ते दीनानाथ रूग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रकृती साथ देत नसली तरी या आजाराला सकारात्मक तोंड देण्याची जिद्द आहे, या परिस्थित देखील समृद्धपणे आयुष्य जगण्याची इच्छा आहे, असं त्यांच्या देहबोलीतून जाणविले, असं एकनाथ शिंदे आमटेंची भेट घेतल्यानंतर म्हणाले. तसेच भेटीनंतर शिंदेंनी प्रकाश आमटेंच्या पत्नी डाॅ. मंदाकिनी आमटे, मुलगा कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबीयांशी संवाद साधला व त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

तसेच भाजपचे नेते गिरिश बापट, शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीवर देखील याच रूग्णालयात उपचार सुरू आहेत, यांची देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी शिंदेंसोबत उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे उपस्थित होते.

दरम्यान, डाॅ. प्रकाश आमटेंनी आपलं संपूर्ण आयुष्य हे आदीवासींची सेवा करण्यात व्यतीत केलं आहे, त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नीने  दिलेली साथ ही त्यांना अनमोल ठरली आहे. त्यांच्या जीवनावर 2014 साली डाॅ. प्रकाश बाबा आमटे हा मराठी चित्रपट देखील आला. या चित्रपटात प्रकाश आमटेंची भुमिका नाना पाटेकर यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! शिंदे विरूद्ध शिवसेना वादावरील सुनावणी पुढे ढकलली

‘जर हे नेते इतकेच त्रस्त होते तर…’, शिवसेनेचा शिंदे गटाला थेट सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्यावर पुणेकरांची नाराजी

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…

प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More