Top News

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

मुंबई | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. त्यामुळे अचानक त्यांनी ही घोषणा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडीओत आपण निवृत्ती घेत असल्याचं कारण स्पष्ट केलं असून याचा कौटुंबिक किंवा इतर गोष्टींशी काही संबंध नसल्याचं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही, असा विश्वास हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या