बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उमेदवारी अर्ज भरताच गंभीरही झाला ‘चौकीदार’

नवी दिल्ली | भाजप प्रवेश केलेल्या क्रिकेटर गौतम गंभीरला अखेर पूर्वी दिल्लीमधून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गंभीरने लगेचच आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ लावलं आहे.

गंभीरने एक महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याला भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गौतमने पूर्व दिल्लीतील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच माझा नवा प्रवास संस्मरणीय बनवल्याबद्दल आभार, असं तो म्हणाला आहे.

दरम्यान, गौतम गंभीरने नावापुढे चौकीदार लावत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या मोहिमेशी स्वत:ला जोडून घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

-अब आऐगा मजा, हिसाब सबका होगा- नितेश राणे

नरेंद्र मोदींची कोपरखळी; ट्विंकलने दिलं ‘हे’ उत्तर

-या खुळ्यांना काय वाटलं खरंच 15 लाख मिळणार- विनोद तावडे

-पराभवानंतर विरोधकांनी दोष ईव्हीएमला देण्याचं ठरवलंय- नरेंद्र मोदी

-भाजपच्या जाहिरातीतील कुटुंब राज ठाकरेंच्या व्यासपीठावर; विनोद तावडे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More