मुंबई | 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं. राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
मध्यावधी निवडणूकासाठी तयार रहा, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत असताना शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज आहे. विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीजास्त वेळ द्या, असंही त्यांनी सांगितल.
सगळ्या बंडखोर आमदारांना मंत्रीपद हवं असल्याने त्यांच्याात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आतापासून तयारीला लागा, असे निर्देश शरद पवारांनी आमदारांना दिले आहेत.
मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळालं नसल्याने भाजपमध्ये आधीपासूनच नाराजीचे सुर आहेत. त्यात शदर पवार यांनी केलेल्या भाकीतामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे भाकीत खर होईल का? हे येणारी वेळ सांगेल.
थोडक्यात बातम्या
“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”
‘अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी…’; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला
शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा
“कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, इतकी
Comments are closed.