बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालकांसाठी खुशखबर! लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ‘या’ लसीच्या चाचणीला लवकरच होणार सुरुवात

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लसने आता डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यातच लहान मुलांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी यांनी मिळून तयार केलेल्या नोवोव्हॅक्स या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि एका अमेरीकन औषध कंपनीने लहान मुलांना देण्यात येणारी ही लस बनवली आहे. तर पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम रुग्णालयात लहान मुलांवर या लसीच्या चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 12 ते 17 या वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार असून त्यांच्यावरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर 2 ते 11 या वयोगटातील लहान मुलांवर या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांची लस बाजारात उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, देशातील 10 ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेल्या नोवोव्हॅक्स या लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये लहान मुलांवरील या लसीच्या चाचणीला सुरुवात होणार असून चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच 2 ते 17 या वयोगटातील लहान मुलांसाठी ही लस उपलब्ध होईल.

थोडक्यात बातम्या

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निर्बंध लागू; काय सुरू?, काय बंद?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

’40 वर्षाच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार’

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लसच्या 21 रुग्णांच्या लसीकरणाबद्दल ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More