बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका

सांगली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1 मेपासून सर्वांना लसीकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र राज्य सरकारने राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपेंवर टीका केली आहे.

काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का?, असा सवाल पडळकरांनी केला आहे.

राज्य सरकारला उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत आणि भाजपला विरोधी करण्यासाठी हे एकत्र आसे असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत लस मिळाली तर लसीकरण करता येईल आणि लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळणार असल्याचं टोपेंनी सांगितलं होतं. राजेश टोपेंच्या या टीकेवर टोपे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात शववाहिकांचा तुटवडा; प्रादेशिक परिवहन विभागाने ‘या’ वाहनांना दिली शववाहिकेची परवानगी

लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत

“संसद भवन महत्त्वाचं की नागरिकांचं लसीकरण?”; पवारांचा रोखठोक सवाल

…अन् कोरोना रुग्णाचं 5 लाखांचं बील आलं अडीच लाखांवर; खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट उघड

‘या’ तारखेनंतर 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा सरकारचा विचार- किशोरी पेडणेकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More