बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजीबाईंचा नादच खुळा! वयाच्या 75 व्या वर्षी केला झिंगाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | सोशल माध्यमांवर केव्हा काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. व्हायरल झाल्यावर त्यातून काहीजण स्टारही झाले आहेत. रानू मंडलचंच उदाहरण घ्या ना, एका गाण्याने तिचं संपुर्ण आयुष्य बदलून टाकलं. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडणारे असतात. अशाच प्रकारे एका आजींचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक आजी स्वतःमध्ये हरवून मनमुराद डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स करतानाचा उत्साह पाहून एखाद्या तरण्याताठ्या मुलालाही लाजवेल असाच आहे. कदाचित त्यामुळेच हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

आजीचं वय हे साधारण 70 ते 75 च्या आसपास असावं. या वयात सोडाच आताची तरूणपिढी एखाद्या 50 ते 60 वर्षाच्या माणसाप्रमाणे नगारे घेऊन फिरत आहे,  नगारे म्हणजे त्यांचं पोट हो. त्यामुळं त्यांना आजींसारखा ताल धरणं कठीण जाईल. पण एकडे आजींनी मात्र असा काही धरला आहे की अगदी तरुण मुलगीच डान्स करत आहे. त्यांच्या डान्समधून ती लचक दिसून येत आहे.

दरम्यान, आपल्याकडे अशा प्रकारे आजी डान्स करताना दिसणार नाही. क्वचित घरात काही कार्यक्रम, समारंभ असेल तर आपली आजी थोडीफार डान्स करते नाहीतर ते पण नाही. मात्र हा व्हिडीओमधील आजी बिंधास्तपणे डान्स करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

नागीन डान्स करत कोरोना बरा करणाऱ्या भोंदू बाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश

युपीएससीची परीक्षा क्रॅक करणाऱ्या प्रांजलला कोरोनाने हिरावलं, उपचारादरम्यान मृत्यु

कोरोनाने निधन झालेल्या मोठ्या भावाला मिठी मारून रडला, सकाळी दोघांवर झाले अंत्यसंस्कार

शाब्बास पुणेकरांनो! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर 3000 पेक्षा जास्त डिस्चार्ज

लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात! एका नवरीशी लग्नासाठी आले दोन नवरदेव, त्यानंतर घडलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More