बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादमधील चर्चित जोडपं हर्षवर्धन जाधव-ईशा झा यांनी उभारली गुढी, पाहा फोटो

औरंगाबाद | औरंगाबादमधील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या नव्या जोडीदारासमवेत गुढीपाडवा हा सण साजरा केला. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत, पण कौटुंबिक मतभेदामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच इशा झा याच माझ्या जोडीदार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

आज हर्षवर्धन जाधव यांनी फोटो शेअर केल्यानंतर इशा झा यांच्याबरोबर जोडीने गुढीपाडवा साजरा केल्याचं समोर आलं आहे.

हर्षवर्धन जाधव हे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. तसेच रावसाहेब दानवे व हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद हा जगजाहीर आहे. आता इशा झा या त्यांच्या मैत्रीण त्यांची जोडीदार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी एकत्र गुढी देखील उभारल्याचं पाहायला मिळालं.

त्या फोटोमध्ये इशा झा आणि हर्षवर्धन जाधव हे पारंपारिक पद्धतीने गुढीचे पूजन करून नव्या वर्षासह आपल्या नव्या संसारालाही सुरुवात करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ईशा या देखिल हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या

पहिल्या भेटीतच महिला काढायला लावायच्या कपडे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

“खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा साठा केला असता तर जीव वाचले असते”

प्रचाराचा असाही फंडा!, राजू शेट्टींनी वापरली ‘ही’ भन्नाट आयडिया

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’मधील वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More