बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शार्लिन चोप्रा आणि राज कुंद्रामध्ये झाला होता ‘हा’ मोठा करार

मुंबई | शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात अभिनेत्री शार्लीन चोप्रा आणि पूनम पांडे यांचं देखील नाव समोर आलं आहे.

शार्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर एक करार झाला होता. हा करार भारताबाहेरील काही कंपन्यांसाठी अश्लील कंटेक्ट देण्यासंबंधीत होता, अशी माहिती समोर आली आहे. शार्लिनचे पुर्वीचे वकील चरणजीत चंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्लिन सेमी पॉर्नोग्राफीसोबतंच स्वत:चा एक अॅप चालवत होती.

शार्लिनचे हे पार्ट टाईम काम काही खास चालले नव्हते. काही दिवसांनंतर शार्लिनवर राज कुंद्राची नजर पडली. राज कुंद्राने शार्लिन बरोबर एक करार केला होता. या करारानुसार शार्लिनला प्रॉफिटच्या 50 टक्के मिळणार होता. या अॅग्रीमेंटवर राजने स्वत: सही केली होती, असा देखील खुलासा चरणजीत चंद्रपाल यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याप्रकरणी राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. राजविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

…म्हणून मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचं पुन्हा स्पष्टीकरण

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More