मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) कारवाई झाली. या कारवाईनंतर संजय राऊत यांच्यावर अनेक टीका-टीपणी करण्यात आली. कारवाईनंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad PAwar) यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊतांवर अनेक आरोप केलेले पहायला मिळाले. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी शिवसेनेमध्ये असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो. मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलेय का?, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
तुमची मती भ्रष्ट झाली आहे हे माहिती आहे. पण तुमची मती इतकी भ्रष्ट झाली तर राज्यातील जनतेला तुमच्या एकंदरीत मानसिक आरोग्याविषयी शंका आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. मुंबई विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
थोडक्यात बातम्या –
“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”
रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…
“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…”
‘चंद्रकांत दादा परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’, कोथरूडमध्ये पुणेकरांची खास टोमणेबाजी
पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
Comments are closed.