बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

नवी दिल्ली | मुलगा सज्ञान झाला म्हणून वडील त्याच्या शैक्षणिक खर्चाला नकार देऊ शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. मुलाचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उच्च शिक्षणाचा खर्च करू शकणार नाही, अशी याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती. ही दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

जोपर्यंत मुलं स्वत:ला पोसण्याइतपत सक्षम होत नाहीत, तोपर्यंत वडिलांनी त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलणं अनिवार्य आहे. मुलाचं वय 18 वर्ष झालं म्हणून त्याच्या आईवरदेखील शिक्षणाचा आर्थिक भार टाकू नये, असं निकाल देताना न्यायालयाने नमूद केलं आहे.

मुलाने वयाची 18 वर्षे पूर्ण केली की, तो सज्ञान झाल्याने वडील म्हणून त्याच्या शिक्षणाची जबाबदारी झटकू शकत नाहीत. मुलगा सज्ञान असला तरी तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेलच असं नाही. तसेच तो स्वत: पोसेल इतका सक्षम असेल असं नाही. मुलांची आई जर मुलांवर खर्च करत असेल आणि आईच्या हातात किरकोळ रक्कम राहत असेल तर आईला मदत करण्याची वडिलांची जबाबदारी आहे, असं न्यायमुर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं आहे.

दरम्यान, याचिकाकर्त्यांचं नोव्हेंबर 1997 मध्ये लग्न झालं होतं आणि त्यांचा घटस्फोट झाला होता. या दोघांनाही आता 20 वर्षांचा मुलगा आणि 18 वर्षांची मुलगी आहे.

थोडक्यात बातम्या –

कौतुकास्पद! संकटाला आनंदाने सामोरं जाणाऱ्या पुण्याच्या आजीला नेटकऱ्यांनी केला सलाम

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More