बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेक असावी तर अशी!, भारतीय संघातील ‘या’ खेळाडूच्या प्रेयसीकडून वडिलांना यकृत दान

मुंबई | आपल्याकडे घरात प्रत्येकाला मुलगा हवा असतो आणि मुलगी म्हटलं की नको वाटायचं. आताच्या काळात हे अशी माणसिकता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र मुलीही आता कमी राहिल्या नाहीत, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. अशातच एका लेकीने आपल्या वडिलांना यकृत दान केलं आहे.

आपल्या वडिलांना यकृत दान करणारी मुलगी ही भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची प्रेयसी आहे. पूजा बिजारनिया असं नवदीपच्या प्रेयसीचं नाव आहे. पूजाने आपल्या वडिलांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे 55 टक्के यकृत वडिलांना दान केलं.

या उपचारासाठी पूजा आणि तिच्या कुटुंबीयांना स्वत:ची संपत्ती विकावी लागली. पूजाचं लिव्हर तिच्या वडिलांना ट्रान्स्प्लांट करणारे डॉ. रचित श्रीवास्तव यांनी मीडियाला ही माहिती दिली. अवयव दान करण्यासाठी कोणी पुढे येत नाही मात्र आपल्या वडिलांसाठी पूजान हसत-हसत यकृत देण्याचा निर्णय घेतला. पूजाच्या या कृतीची सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा आहे तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, नवदीप आणि पूजा आयपीएलदरम्यान एकत्र दिसले होते. नवदीप सध्या आयपीएलमध्ये बंगळुरू संघात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. नवदीप ताशी 150 किलोमीटर वेगाने चेेंडू टाकू शकतो. युवा गोलंदाजाची गती पाहून अनेकांनी सैनी यशस्वी गोलंदाज होणार असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! तरुणीचा पाठलाग करुन भररसत्यात फाडले तिचे कपडे अन्…

प्रेयसीवर संशय घेऊन मध्यरात्री तिच्या घरी जाणं प्रियकराच्या जीवावर बेतलं; घडला धक्कादायक प्रकार

कोरोना झालेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी झाला तडफडून मृत्यू

राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं कोरोनाने निधन

‘मुंबईकरांनो घरातून बाहेर पडू नका’; किशोरी पेडणेकरांनी जोडले हात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More