Top News औरंगाबाद महाराष्ट्र

चालून थकलो आहे मला घ्यायला या… बीडच्या तरूणाचा वडिलांबरोबर अखेरचा संवाद अन्….

पुणे | चालूल चालून खूप थकलो आहे. आता माझ्या पायात त्राण देखील उरला नाही. मला घ्यायला या, असा फोनवरून बापलेकाचा संवाद झाला. पुन्हा चालायला लागला. वाटेत अन्न काय पाणीही मिळेना. शेवटी पाण्याच्या शोधात एका विहीरीत उतरला. अन् तिथेच त्याच्या जीवनाचा अंत झाला. ही हृदयद्रावक कथा आहे बीडच्या एका तरूणाची.. रामेश्वर सीताराम पवार असं त्या 31 वर्षीय तरूणाचं नाव आहे. कोरोनाने मानवाची नेमकी काय अवस्था झालीये हे यामुळे लक्षात येईल.

कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाला घाबरून सगळेच जण जावाकडची वाट धरू लागले. पुणेस्थित बीडच्या तरूणाच्या कुटुंबाने देखील गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तरूणाच्या बायको आणि मुलांनी कसंबसं गाव गाठलं. पण मार्च महिन्यातला पगार घेऊन येतो. तुम्ही पुढे जावा, असं त्या तरूणाने त्यांना सांगितलं.

मात्र गावाकडे जाण्यासाठी एकही गाडी नाही. पुण्यापासून चालत जाण्याचा त्याने निर्णय घेतला. शिरूरपर्यंत तो चालला. परंतू पायात अधू असल्याने त्याला आता चालणं शक्य नव्हतं. त्याने वडिलांना फोन करून मला घ्यायला या. मला आता चालणं शक्य नाही, असं सांगितलं. मात्र लॉकडाऊन असल्याने वडिलांना देखील येणं शक्य नव्हतं.

दरम्यान, शिरूरजवळच्या एका विहीरात त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला. त्यांनी मग रामेश्वरच्या घरी संपर्क करून घडलेल्या घटनेबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी गावाकडे पार्थिव घेऊन जाण्यास परवानगी नाकारली. मग कुटुंबियांनी शिरूरमध्येच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

ट्रेंडिंग बातम्या-

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृतांची संख्या 52 वर

शेतकऱ्याच्या लेकीचा मदतीचा हात; गोरगरिबांना देणार स्वत:च्या शेतातली ज्वारी तसंच गरजेच्या वस्तू

माजी पंतप्रधान मोहम्मद जिब्राईल यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या