बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ब्रेक!

मुंबई | कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक लागणार आहे.

लसीचा तुटवडा दिसून आल्याने उद्या गुरुवारी शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. अशातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

लसीकरण मोहीम वेगाने सुरू ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने जागतिक स्तरावर निविदा मागून एक कोटी लस खरेदी करण्याची प्रयत्न केला होता. मात्र या स्पर्धेत सहभागी आठही पुरवठादार अपात्र ठरल्यानंतर ही निविदा गुंडाळण्यात आली.

दरम्यान, केंद्राकडून मिळणाऱ्या लसींचा साठा मर्यादित स्वरूपात असल्याने पुन्हा एकदा या मोहिमेला फटका बसला आहे. काही दिवसांमध्ये एका दिवसात एक लाखांहून अधिक लोकांना लस दिली जात आहे. सोमवारी आतापर्यंतचे सर्वाधिक एक लाख 80 हजार नागरिकांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत 53 लाखांहून अधिक लोकांना लस मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलत द्या; ‘या’ भाजप खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

‘शेतकऱ्यांची बदनामी करुन भाजपच्या हाती काहीही लागणार नाही’; शेतकरी आंदोलनावरुन अखिलेश यादव कडाडले!

“अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे माहित नाही”

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More