बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद

नवी दिल्ली | संपुर्ण देशभरात गेल्या तब्बल दिड वर्षापासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता देशातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 209 दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात वाढत असलेली रूग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. काल देशात 18,346 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 29 हजार 639 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 263 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 04 लाख 49 हजार 260 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 02 लाख 52 हजार 902 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असल्याने अजून चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत भारतात 91 कोटी 54 लाख 65 हजार 826 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

  …म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

आता विदर्भातील ‘या’ शहरात होणार नवं विमानतळ; पुढच्याच वर्षी होणार प्रवासी वाहतूक

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

परतीच्या पावसामुळे ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढचे 4 दिवस धोक्याचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More