जकार्ता | जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18व्या आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये नेमबाज संजीव राजपूतने भारताला 8 वे पदक मिळवून दिले. 50 मिटर रायफल 3 पोझिशन या प्रकारात त्याने रौप्य पदक मिळवलं आहे.
संजीवने अनोखी कामगिरी करत 452.7 गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. तर, चीनच्या ह्यू झीचेन्गने 453.3 गुणांसह प्रथम क्रमांक पटकवला आहे. भारताला नेमबाजीमध्ये मिळालेले हे 6 वे पदक आहे.
दरम्यान, या आधी संजीवने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून सर्वांचीच मने जिंकली होती. त्याच्या या कारकिर्दित आणखी एका पराक्रमाची भर पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती
-वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!
-समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!
-धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात