बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी आंदोलनावरुन जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…

ठाणे | राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून (ST Employee Strike) राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली असली तरी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पण या आंदोलनावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आंदोलनाच्यामधे का पडतात? त्यांच्या घरी बैठका का होतात? असा सवाल उपस्थित केला जात असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून टीकेची झोडही उठवली.

काही राजकीय नेते एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात. काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम सुरू केले असल्याचा घणाघाती आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला असल्याचंही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, गेल्या 40 वर्षांपासून जेव्हा कधी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रयत्न केले. उसतोड कामगारांच्या आंदोलनावेळी गोपीनाथ मुंडे उसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन शरद पवारांकडे यायचे आणि पवारसाहेब त्यांचे प्रश्न मिटवत असल्याचंही आव्हाड म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

अनिल कपूर यांची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज? जर्मनीतून शेअर केला व्हिडीओ

‘…म्हणून मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

“पगारवाढ करूनही संपाचा हट्ट कायम असेल तर…”

महागाईचा भडका; सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळू शकतात ‘इतके’ लाख रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More