Top News महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतवरही जोरदार टीका केली. याच टीकेला कंगणाने प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. जनतेचे सेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टीवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता त्याचा वापर करून तुम्ही तुमच्याशी सहमत नसलेल्यांविरूद्ध त्यांना हाणी पोहोचवण्यासाठी करत आहात, असं कंगणाने म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देशाचं विभाजन करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कोणी बनवलं, हे लोकांचे सेवक आहेत. यांच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कोणतातरी व्यक्ती असेल. मग ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकिचा असल्यासारखं का वागत आहेत, असा सवालही कंगणाने केला आहे.

दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले होते.

 

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांचा 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा…; खासदार भावना गवळींचा इशारा

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे”

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या