Top News मनोरंजन

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

मुंबई | कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशातील हरियाणा, पंजाब, राजस्तान आणि इतर राज्यातील शेतकरी संघटना दिल्लीत आंदोलनासाठी गेल्या आहेत. मात्र काही दिवसांपुर्वी अभिनेत्री कंगणा राणावतने एका आंदोलनकर्त्या शेतकरी आजीला रोजावर आणल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्कर संतापली असून तिने कंगणावर निशाणा साधला आहे.

कंगणाला वादग्रस्त वक्तव्य करायला आवडतं. खोटे संदर्भ देऊन कंगणा विष ओकत असते. राजकारण, चित्रपट, क्रीडा कुठलाही विषय असो ती नकारात्मक ट्विटच करत असते. विशिष्ट अजेंडा चालवणाऱ्या अशा मंडळींना आपण प्रत्युत्तर द्यायला हवं, असं स्वरा भास्कर म्हणाली.

कंगणाला त्या आजीनेसुद्धा उत्तर दिलं होतं. माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे काम नसेल तर तु माझ्या शेतात मजुरीला ये, असं आजींनी म्हटलं होतं. महिंदर कौर असं त्या आजीचं नाव आहे.

दरम्यान, दिल्लीत शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये आजही बैठक झाली. मात्र आजच्याही बैठकीतून तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यांनी आता हिमालयात जायला हवं”

धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…

दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र

कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडसे

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या