बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मंत्र्याच्या सेक्स सीडीतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

बंगळुरु | कर्नाटक सरकारमधील मंत्री रमेश जारकीहोळी यांचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ असून ते सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असल्यानं जारकीहोळी यांची भलतीच नाचक्की झाली असून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला जात आहे. जारकीहोळी यांनी नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप कलहळ्ळी यांनी केला आहे. बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून पीडित तरुणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत तिला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याची मागणी देखील केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

कर्नाटक सरकारमधील बड्या मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. मंत्र्याने पीडित तरुणीवर नोकरीचं अमिष दाखवून अत्याचार केले, मात्र नोकरी दिली नाही. त्यामुळे संबंधित तरुणीने काही क्षण रेकॉर्ड केले, मंत्र्याला ही बाब समजताच त्याने तरुणीला धमकी दिली, अशी माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेले व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचे असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये मंत्र्यासह संबंधित तरुणीसुद्धा दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप झाल्यानंतर आता कर्नाटकातील मंत्री देखील धक्कादायक प्रकारात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ-

याआधी समोर आलेला व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी

बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More