बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबईकरांनो घरातून बाहेर पडू नका’; किशोरी पेडणेकरांनी जोडले हात

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

घरातून बाहेर पडू नका. डबल मास्क वापरा, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना हात जोडून केलं आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा. घराबाहेर पडताना डबल मास्क लावा. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असं आवाहन पेडणेकर यांनी केलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती केली.

लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्याची मोहित प्रशासनानं हाती घेतली आहे. त्यासंदर्भात राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं असल्याचं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

लसीकरणाची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अख्त्यारित असल्यामुळं ज्यांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे आणि ज्यांना मेसेज आला आहे त्यांनीच लसीकरण केंद्रावर जायचं आहे, मेसेज न दाखवल्यास लसीकरण होणार नाही असं सांगत सर्वांनीच या टप्प्यावर सहकार्य करण्याची अपेक्षा किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

थोडक्यात बातम्या- 

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत

लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ‘इतक्या’ लाखांची मदत

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

चंद्रपूर हळहळला! अवघ्या 35 वर्षीय डाॅक्टराचा कोरोनामुळे मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More