शांघाय| गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात आणि देशात कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. मात्र, जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. चीनमध्ये कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
चीनमधील शांघायमध्ये एकाच दिवसात 8000 पेक्षा जास्त रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. शांघाय शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट नियंत्रणात ठेवण्यासाठी 28 मार्चला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
पश्चिम शांघायमधील 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना या लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी सार्वजानिक वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. अनेक व्यवसाय देखील बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना रूग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे शांघायच्या पुर्वेकडील भागात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर रूग्णसंख्या दुप्पट होत असल्यामुळे शहराच्या पश्चिमेकडील भागातही लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
दरम्यान, येथील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूमध्ये अनेक म्युटेशन्स होत असल्याने नवनवे व्हेरिएंट्स तयार होत आहेत. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट तयार होत असल्याने कोरोनावरील अंतिम उपाय शोधणे तज्ज्ञांना कठीण जात आहे.
थोडक्यात बातम्या-
‘अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’; सुजात आंबेडकरांचं खुलं आव्हान
‘देवेंद्र भाऊ तुम्ही अॅडजस्ट करून घेतलं तर…’, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला
S.T Strike| एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ बाहेर निघालं”
“इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे”
Comments are closed.