बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्र सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केलं’, आशिष शेलारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचं ‘हे’ प्रत्यूत्तर

सांगली | सांगली दौऱ्यावर असताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच महाविकास आघाडी सरकारने राज्याला कोरोनाची राजधानी केल्याचं आशिष शेलार यांनी सांगलीमध्ये बोलताना म्हटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लसीचा साठा अपुरा आहे. तसेच केंद्राने लसीकरणासाठीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या पाहिजे’, असं म्हणत आशिष शेलार यांनी लसीच्या पुरवठयामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असा पलटवार जयंत पाटील यांनी सांगली येथे बोलताना केला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिबंधक लसीच्या पुरवठयासंदर्भात केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार असा वाद निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच केंद्राने संपूर्ण लसीकरणाची जबाबदारीही घेतली व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

सांगलीमधील बहुतांश नागरिक कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असताना विरोधी पक्षाने केंद्राला सांगून महाराष्ट्रात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More