बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. असीम हे कालीघाट येथे राहत होते.

असीम यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला, असं कोलकाताच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकाचे चेअरमन डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं.

असीम यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यांपासून ते रुग्णालयात अॅडमिट होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झालं होतं. आज सकाळीच कोरोना नियमांचं पालन करत निमाताला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पश्चिम  बंगालमध्ये गेल्या 24 तासात 20 हजार 748 रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यात एकूण दीड लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय राज्यात गेल्या 11 दिवसांपासून 100 हून अधिक रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ 22 उमेदवारांना बार्टीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

“फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय”

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More